बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः पवईत बुधवारी (ता. ८) एका खासगी बसने दुचाकीस्वाराला जबर धडक दिल्याची घटना घडली असून या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. सुशील मोहन सावंत असे या दुचाकीस्वाराचे नाव असून सुशील हे ठाणे येथील रहिवासी आहेत. सुशील हे ठाणे येथून जेवीएलआरमार्गे अंधेरीच्या दिशेने आपल्या दुचाकीने कामावर जात होते. दरम्यान, सुशील हे पवई आयआयटी मार्केट जंक्शनजवळ येताच एका खासगी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यांना तात्काळ नजीकच्या पवई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी सुशील यांना मृत घोषित केले. पवई पोलिसांनी चालकाला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.