Mon, March 20, 2023

मनसेची पालिकेविरोधात बॅनरबाजी
मनसेची पालिकेविरोधात बॅनरबाजी
Published on : 9 March 2023, 10:25 am
गोरेगाव, ता. ९ (बातमीदार) : मालाड पूर्व येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात बॅनर लावले आहेत. यात त्यांनी महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सावित्रीबाई फुले माता व बाल रुग्णालयात भ्रष्टाचार झाला असल्याचे त्या बॅनरमध्ये नमूद आहे आणि पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्या नावासह दूरध्वनी क्रमांकसुद्धा दिला आहे आणि आयुक्तांना जाब विचारा, असे आवाहनही केल्याचे त्यात दिसत आहे. यासंदर्भात मनसे कार्यकर्ता विजयसिंह बोरा यांनी सांगितले, की या दवाखान्याचे काम मागील वर्षी जे सुरू झाले ते अजून पूर्ण झालेच नाही आणि ते तसेच अर्धवट आहे; मात्र या कामासाठी निधी मंजूर झाला असून त्यात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप बोरा यांनी केला आहे.