Wed, March 29, 2023

अवकाळीमुळे घरावरील छताचे नुकसान
अवकाळीमुळे घरावरील छताचे नुकसान
Published on : 9 March 2023, 10:18 am
सरळगाव, ता. ९ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यात आवकाळी पावसाबरोबरच सोसाट्याच्या वाऱ्याने आदिवासी बांधवांच्या घरांवरील कौले व पत्रे उडाल्याने मोठे अर्थिक नुकसान झाली आहे. सोमवारी मुरबाड तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वीटभट्टी, बागायतदारांचेही नुकसान झाले. तालुक्यातील कोचरे बु. येथील आदिवासी बांधवांच्या घरांची कौले व सिमेट पत्रे उडाल्याने अर्थिक नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.