Tue, March 28, 2023

वसईत महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान
वसईत महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान
Published on : 9 March 2023, 10:50 am
विरार, ता. ९ (बातमीदार) : वसईतील ख्रिस्तीना घोन्साल्विस फाऊंडेशनतर्फे १९ महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस, फादर थॉमस लोपीस आणि पोलिस आयुक्त पद्मजा बडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन घोन्सालवीस यांनी केले. या वेळी २० पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी करोना काळात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस, फादर थॉमस लोपीस आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिना डायस यांनी; तर आभार रेखा युरी घोन्सालवीस यांनी मानले.