Tue, March 21, 2023

बालिवलीत आरोग्य शिबिर, संगीत खुर्ची स्पर्धा
बालिवलीत आरोग्य शिबिर, संगीत खुर्ची स्पर्धा
Published on : 9 March 2023, 10:51 am
वाडा, ता. ९ (बातमीदार) : बालिवली येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे खेळ, आरोग्य शिबीर, विविध प्रकारच्या गीतांचे सादरीकरण आणि हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक संजय फराड यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. गावातील महिलांना बालसंगोपन, प्रसूतीविषयक माहिती व पौष्टिक आहार कसा असावा याची माहिती आयडियल हॉस्पिटलच्या डॉ. वैभवी पाटील यांनी दिली. पोष्ट खात्याच्या कर्मचारी शिल्पा चाफेकर यांनी पोष्टाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमात उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच संगीत खुर्चीचा खेळ खेळवण्यात आला.