Tue, March 21, 2023

दुर्मिळ सापाची तस्करी करणारे अटकेत
दुर्मिळ सापाची तस्करी करणारे अटकेत
Published on : 9 March 2023, 12:36 pm
मनोर, ता. ९ ः पालघर तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत क्षेत्रातील सज्जनपाड्यात दुर्मिळ मांडुळ प्रजातीच्या तीन किलो वजन आणि चार फूट लांबी असलेल्या सापाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने चारही आरोपींना शुक्रवारपर्यंत वनकोठडी दिली आहे.