
चोरीच्या मुद्देमालासह ३१ वर्षांच्या मोलकरणीला अटक
चोरीच्या मुद्देमालासह
मोलकरणीला अटक
अंधेरी, ता. ९ (बातमीदार) ः चोरीच्या मुद्देमालासह एका ३१ वर्षांच्या मोलकरणीला बांगूरनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. प्रमिला जगन्नाथ रहाटे ऊर्फ प्रमिला अब्दुल शेख असे आरोपीचे नाव असून तिच्याकडून पोलिसांनी एक लाख १३ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
तक्रारदार महिला गोरेगाव परिसरात राहते. १५ नोव्हेंबर २०२२ ते २२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान तिच्या राहत्या घरातून विविध सोने-चांदीचे शिक्के, सोन्याचे दागिने, स्मार्ट वॉच आदी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. तिने बांगूरनगर पोलिसांत चोरीची तक्रार केली होती. गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी प्रमिला हिची कसून चौकशी केल्यानंतर तिने चोरीची कबुली दिली. बोरिवली सत्र न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली आहे. तिच्याकडून लवकरच चोरीचे उर्वरित दागिने हस्तगत केले जातील असे पोलिसांनी सांगितले.