Sat, April 1, 2023

नऊवारीतून जगभ्रमंती
नऊवारीतून जगभ्रमंती
Published on : 9 March 2023, 2:42 am
नऊवारीतून जगभ्रमंती
मुंबई : ‘भारत की बेटी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील रमिला लटपटे यांनी ‘डेव्हलप इंडिया व्हीजन’चा प्रसार करण्यासाठी मोटरसायकलने जगभ्रमंती करण्याचा संकल्प केला असून महिला दिनाचे औचित्य साधत गुरुवारपासून त्यांनी त्याची सुरुवात केली. ‘गेट-वे आॅफ इंडिया’ परिसरात त्यांच्या जगभ्रमंती मोहिमेला झेंडा दाखवण्यात आला. विशेष म्हणजे, पारंपरिक पेहराव असलेली नऊवारी साडी नेसून त्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. ३६५ दिवसांमध्ये साधारण २० ते ३० देशांचा सुमारे एक लाख किलोमीटरचा प्रवास करून त्या ८ मार्च २०२४ रोजी पुन्हा भारतात परतणार आहेत. प्रवासादरम्यान भारत व महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक देशापर्यंत पोहोचविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. (छायाचित्र ः विजय गोहील)