वर्तुळाकार मेट्रोचा मार्ग सुसाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्तुळाकार मेट्रोचा मार्ग सुसाट
वर्तुळाकार मेट्रोचा मार्ग सुसाट

वर्तुळाकार मेट्रोचा मार्ग सुसाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ ः ठाण्याची अंतर्गत वाहतूक कोंडी फोडणाऱ्‍या महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात चालना देण्यात आली आहे. नवीन प्रकल्पांच्या यादीत या प्रकल्पाने स्थान मिळवल्याने गेल्या चार वर्षांपासून केवळ कागदावर असलेला या प्रकल्पाला गती येणार आहे. याशिवाय ठाणे-वसई जलवाहतुकीचा मार्गही मोकळा करण्यात आला आहे.
विधिमंडळात गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. मुख्यमंत्री ठाण्याचे असल्याने जिल्ह्यासाठी कोणत्या नवीन योजना येतील; तसेच कोणते प्रकल्प मार्गी लागतील, याची उत्सुकता होती. अपेक्षेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यासाठी भरीव निधीची तरतूद या अर्थसंकल्पात केल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने ठाणे शहराअंतर्गत वर्तुळाकार मेट्रोचा समावेश करण्यात आला आहे. मार्च २०१९ मध्ये तत्कालीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवीन ठाणे ते ठाणे या २९ किमीसाठी १० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हा ठाणे महापालिका हा प्रकल्प राबवणार होती. अखेर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. केंद्रात भाजप आणि राज्यात भाजप- शिवसेना सरकार असल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला ठाणे खाडी जलवाहतुकीचा मार्गही यानिमित्ताने सुकर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकल्पाची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
...