उन्हाळ्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हाळ्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती
उन्हाळ्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती

उन्हाळ्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती

sakal_logo
By

रोगप्रतिकारक शक्तीचा ‘रस’बाण
नेरूळ, बातमीदार
उन्हापासून संरक्षणासाठी फक्त थंड पाणी आणि शीतपेयांवरच अवलंबून राहणे प्रकृतीसाठी घातक असते. संपूर्ण दिवसभर रोगप्रतिकारक क्षमता टिकवून ठेवणाऱ्या थंडपेयांपेक्षा विविध फळांपासून बनवलेले रस कित्येक पटीने उत्तम असतात. यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रणात तर ठेवता येते. शिवाय उष्माघाताला प्रतिकारासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच घरोघरी थंड पेय म्हणून विविध प्रकारचे सरबत हमखास बनवले जातात.
----------------------------
कोरफड ः कोरफड रस चवीला तुरट असला तरी या रसात डिहायड्रेशनसारख्या समस्यांना प्रतिकार करण्याची क्षमता अधिक असते. शरीराला थंडावा देण्याव्यतिरिक्त कोरफड रस हा आपल्या त्वचेला ग्लो देण्यास मदत करतो. कोरफडचा पांढरा गर काढून घेतल्यावर त्याला मिक्सरमध्ये चांगल्या पद्धतीने वाटून घ्यावा. त्यानंतर आवडीनुसार चाट मसाला किंवा मीठ घालावे.
--------------------------------
चिंचेचे सरबत ः वाळलेली चिंच घ्यावी. त्यातील चिंचोके काढून नंतर त्यात पाणी घालून भिजत घालावे. काही वेळाने चिंच कुस्करून घ्यावी आणि चिंच काढून घ्यावी. चिंचेच्या पाण्यात साखर, मीठ, सोप आणि जिरे पूड टाकावी व बर्फ टाकून पिण्यास द्यावे.
--------------------------------
बोरांचे सरबत ः बोर हा सर्वांना आवडणारा आहे. प्रथम बोरं धुऊन घ्यावीत. ती कुकरमध्ये उकडावी. उकडलेल्या बोरांच्या बिया काढून टाकाव्यात. उर्वरित मिश्रणात तीन वाट्या साखर टाकावी. घट्ट होईपर्यंत शिजवावे. थंड झाल्यावर बरणीत भरावे. पाणी टाकून हे सरबत पिता येते.
--------------------------------
पुदीना रस ः पुदिन्याचं सरबत हे उन्हाळ्यात आपल्या शरीराला डिहायड्रेशन आणि लूपासून वाचवते. यासाठी मिक्सरमध्ये पुदीना, साखर, मध, काळे मीठ, मिरपूड आणि जीरेपावडर घालून चांगल्या पद्धतीने वाटून घ्या. या पेस्टला पाण्यात मिक्स करून पुदिना पेयाचा आस्वाद घेण्यास तयार आहे.
--------------------------------------
आवळ्याचा रस ः आवळा रस बनवण्यासाठी एका ग्लासात किंवा भांड्यात पाणी घ्या. त्यानंतर या पाण्यात किसलेला आवळा टाका. तसंच थोडं काळं मीठही टाका. मीठ घातल्यानंतर अर्धा तास झाकून ठेवा. अर्ध्या तासानंतर रस गाळून घ्या. आवळ्याचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्येदेखील केला जातो.
------------------------------------------
काकडी रस ः डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी तसेच निरोगी, फ्रेश राहण्यासाठी परिस्थितीत स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी काकडीचा ज्यूस उपयुक्त आहे. काकडी शरीरात पुरेसे पाणी, उच्च रक्तदाब हृदयासोबतच चांगल्या पचनासाठीही फायदेशीर आहे.
------------------------------------------------
गाजर, बीट-संत्र्यांचा रस ः आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतो. या सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये हा रस दररोज प्यायला हवा. कुकरमध्ये गाजर, बीट पाणी घालून शिजवून घ्या. थंड झाले की मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात संत्र्याचा रस घाला. चवीनुसार मीठ घाला. हा रस दाटसर ठेवा. वाढताना थोडंसं दही, कोथिंबीर, सजावटीसाठी व मिरपूड चवीसाठी घाला.
----------------------------------------------
पालकचा रस ः शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. पालकच्या पानांमध्ये खनिजे, व्हिटॅमिन आणि दुसरे काही न्यूट्रीएन्टसचे प्रमाण असते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच त्वचा, केसांच्या समस्यांसह अनेक आजारांशी लढण्यास त्यामुळे मदत मिळते. पालकाची सात ते आठ पाने घ्या. मिक्सरमध्ये पालकाची बारीक पेस्ट तयार करून त्यामध्ये मीठ, चवीनुसार साखर हवी असेल तर साखर मिक्स करा.
------------------------------------
टोमॅटोचा रस ः आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि व्हिटॅमिन ‘सी’, फायबर, कॅल्शिअम आणि फोलेट यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढण्यास मदत करतात. डोळे निरोगी तसेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
--------------------------------------
पेरूचा रस ः आहारातील प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि फायबरमुळे वजन कमी करण्यास मदत करते. दररोज एक पेरू आपले चयापचय नियंत्रित करते आणि वाढत्या वजनावर ब्रेक लावते. कारण केळी, सफरचंद, संत्री यांसारख्या इतर फळांपेक्षा पेरूमध्ये साखर कमी असते. ताजे पेरू सोलून घ्या त्यांचे लहान तुकडे करा. त्यात साखर जशी लागेल व पुदिना घालावा.
-----------------------------------------
फळ-भाज्यांचा रस उन्हाळ्यामध्ये उपयुक्त आहे. संतुलित व आरोग्य राहण्यासाठी शरीरात पुरेपूर पाणी असणे गरजेचे असते. यामुळे फळांचादेखील उपयोग होतो. परंतु कोणताही रस पिण्याच्या आधी हा ताजा आहे की नाही हे लक्षात घ्यावे. काही रस हे जास्त सेवन केल्याने त्रासदेखील होऊ शकतो. त्यामुळे शरीराच्या दृष्टीने योग्य अशा रसांचे सेवन करावे.
- डॉ. मोनाली वाघचौरे, एमडी, आयुर्वेद