मातीच्या भांड्यांमुळे रुचकर जेवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मातीच्या भांड्यांमुळे रुचकर जेवण
मातीच्या भांड्यांमुळे रुचकर जेवण

मातीच्या भांड्यांमुळे रुचकर जेवण

sakal_logo
By

कोमल गायकर, घणसोली
प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचा ट्रेंड म्हणून हल्लीच्या युगात वापर केला जाऊ लागलो आहे. मातीची भांडी देखील याचाच एक प्रकार आहे. पूर्वी प्रत्येक घरात वापरले जाणाऱ्या मातीच्या भांड्यांची जागा नवनवीन प्रकारच्या ॲल्युमिनिअम, जर्मन, तांब्याची भांड्यांनी घेतली आहे. पण उन्हाळा वाढू लागल्याने पुन्हा मातीच्या भांडीचा वापर होवू लागला आहे. विशेष म्हणजे, तरुण पिढी देखील या भांड्यांकडे आकर्षित झाली असून चहासाठीचा कुल्हड, बिर्याणीसाठीची भांडी ऑनलाईन खरेदी केली जात आहेत.
--------------------------------------------------------
घरचे खाणे जुना स्वयंपाक पद्धती पुन्हा वापरात येत आहेत. मातीची भांडी त्यातीलच एक आहे. फक्त भांडी नव्हे तर टोप, कढई, ताट, वाट्या, पेले, जग, कप, चमचे आणि बरेच काही यात समाविष्ट आहे. पूर्वी फक्त गावागावातील आदिवासी पाड्यात वापरली जाणारी मातीची भांडी आता शहराशहरात वापरली जात आहेत. मातीच्या भांड्यांत आद्रता धरून ठेवण्याचा गुणधर्म असल्याने त्यात अन्न हे बराच काळ खराब होत नाही. तसेच या मातीच्या भांड्यांला नक्षीकाम विविध प्रकारचे डिझाईन केले असल्यामुळे स्वयंपाकघराची शोभा देखील वाढत आहे. त्यामुळे अगदी शंभर रुपयांपासून ते हजार दीड हजारांपर्यंत मातीची भांडी उपलब्ध आहेत.
---------------------------------------------
हाडांसाठी लाभदायक
मातीच्या भांड्यात सूक्ष्म तत्त्व असतात जे आपल्या शरीरासाठी हाडांसाठी लाभदायक असतात. मातीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने हाडे मजबूत राहतात. तसेच पचनक्रिया सुरळीत राहते.
-------------------------------------
गावाकडे आजही मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे जेवण अतिशय रुचकर असते. तसेच उन्हाळ्यात मातीच्या भांड्यात बनवलेले जेवण आरोग्याच्यादृष्टीने देखील उपयुक्त ठरते.
-मालती पाटील, महिला
--------------------------------------------------
मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यांतील पदार्थ ताजे राहतात. म्हणून मातीच्या भांड्यांना जास्त पसंती मिळत आहे.
-मनोज मिश्रा, कुंभार