Wed, March 29, 2023

डॉ. अरुण मनोरे यांचे निधन
डॉ. अरुण मनोरे यांचे निधन
Published on : 11 March 2023, 9:46 am
विक्रमगड, ता. ११ (बातमीदार) : विक्रमगड येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण मनोरे यांचे (वय ७४) अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या ४० वर्षांपासून ग्रामीण भागात त्यांनी डॉक्टर व्यवसायातून रुग्णांची सेवा केली. त्यांना लिखाण व वाचनाची आवड असल्याने त्यांनी ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी काही काळ वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये लिखाण केले होते. ग्रामीण भागातील समस्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तसेच त्यांनी स्तंभलेखन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार होता.