
मुंबई-हुबळी दरम्यान विशेष ट्रेन
मुंबई, ता. ११ : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने रेल्वे मुंबई ते हुबळी दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते हुबळीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०७३१८ मुंबई- हुबळी विशेष ट्रेन दादर येथून १३ मार्च २०२३ रोजी दुपारी १.०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता हुबळी येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०७३१७ हुबळी- मुंबई विशेष ट्रेन १२ मार्च २०२३ रोजी हुबळी येथून दुपारी ३.३५ वाजता निघेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पोहोचेल. या दोन्ही विशेष रेल्वे गाड्या पनवेल, पुणे, सातारा, मिरज, उगारखुर्द, कुडची, रायबाग, चिकोडी रोड, घटप्रभा, गोकाक, पाचापूर, बेळगावी, देसूर, खानापूर, लोंडा, तावरगट्टी, अलनावर आणि धारवाड स्थानकात थांबणार आहेत. एक द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, चार शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.