रवींद्र प्रभुदेसाई यांचा षष्ठपूर्ती सोहळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रवींद्र प्रभुदेसाई यांचा षष्ठपूर्ती सोहळा उत्साहात
रवींद्र प्रभुदेसाई यांचा षष्ठपूर्ती सोहळा उत्साहात

रवींद्र प्रभुदेसाई यांचा षष्ठपूर्ती सोहळा उत्साहात

sakal_logo
By

ठाणे, ता. १२ : पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्येष्ठ मराठी उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा शुक्रवारी (ता. ३) ठाणे येथील आयलीफ रिट्स बँक्वेट सभागृहात पार पडला. यानिमित्त पितांबरीचे उत्पादन रुचियाना गूळ पावडर दान करण्याच्या उद्देशाने रवींद्र प्रभुदेसाई यांची तुला करण्यात आली.
या सोहळ्यात प्रभुदेसाई यांच्या कुटुंबीयांसोबतच सॅटर्डे क्लब, उद्योग अनुभव प्रतिष्ठान, कऱ्हाडे
ब्राह्मण संघ, बिझनेस फोरम या संस्थांचे पदाधिकारी तसेच ठाणे शहरातील संघ परिवार, कलाकार, सामाजिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.
मराठी उद्योजक म्हणून गेली ३४ वर्षे राज्याच्या उद्योग क्षेत्रात प्रभुदेसाई यांचे मोठे योगदान आहे. याच अनुषंगाने ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी त्‍यांना मुलाखतीच्या माध्यमातून बोलते केले आणि त्यांचा ६० वर्षांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. दरम्यान, कोकणात पर्यावरणपूरक काम करण्यासाठी पितांबरीच्या माध्यमातून सात लाख वृक्षलागवड केली असून भविष्यात एक कोटी झाडे लावण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या वेळी प्रभुदेसाई यांच्यावर तयार करण्यात आलेला माहितीपट दाखवण्यात आला.
-----------------
प्रत्येकी ६० हजाराचा धनादेश
गेली अनेक वर्षे प्रभुदेसाई वाढदिवसानिमित्त स्वतःच्या वयाइतक्या रकमेची देणगी काही सामाजिक संस्थांना देतात. त्यानुसार यावर्षीही ६० व्या वाढदिवसानिमित्त १२ वर्षे व त्याहीपेक्षा अधिक कार्यकाळ कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांना प्रत्येकी ६० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.