विजेच्या धक्क्याने मुलगी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजेच्या धक्क्याने मुलगी जखमी
विजेच्या धक्क्याने मुलगी जखमी

विजेच्या धक्क्याने मुलगी जखमी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ ः सार्वजनिक शौचालयाच्या टेरेसला लागून असलेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या वायरचा झटका बसल्याने अल्पवयीन मुलगा गंभीर भाजल्याची घटना कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात घडली. सोनू राम (वय १२) असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात सार्वजनिक शौचालय आहे. या शौचालयाचे देखभालीचे काम कंत्राटी पद्धतीने मेघनाथ राम यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबासह शौचालयाच्या टेरेसवर राहण्यास होते. शौचालयाला लागून विजेचा ट्रान्सफॉर्मर असून त्याची वायर शौचालयाच्या टेरेसला लागून आहे. रविवारी (ता. १२) दुपारी मेघनाथ यांचा मुलगा सोनू हा टेरेसवर खेळत होता. या वेळी त्याला विजेच्या वायरचा जोरात झटका बसला. या दुर्घटनेत तो गंभीर भाजला आहे. त्याला उपचारासाठी प्रथम केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात हलवण्यात आले होते; मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.