यंदा शोभायात्रेत ‘रामायणा’ची संकल्‍पना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा शोभायात्रेत ‘रामायणा’ची संकल्‍पना
यंदा शोभायात्रेत ‘रामायणा’ची संकल्‍पना

यंदा शोभायात्रेत ‘रामायणा’ची संकल्‍पना

sakal_logo
By

विरार, ता.१३ (बातमीदार) : वसई तालुक्यात सर्वात मोठी आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारी नालासोपाऱ्याची नववर्ष स्वागत यात्रा यंदा पूर्वीच्याच जोशात निघणार आहे. गुढी पाडवानिमित्त निमित्य निघणाऱ्या स्वागतयात्रेत यावर्षी रामायणावर आधारित संकल्‍पना घेण्याचे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरविण्यात आले.
नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीतर्फे गुढी पाडवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यावर्षी निघणाऱ्या शोभा यात्रेच्या तयारीला आता वेग आला आहे. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, माजी महापौर रुपेश जाधव, माजी उपमहापौर उमेश नाईक, माजी सभापती पंकज ठाकूर आणि हेमंत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही शोभायात्रा निघणार आहे. यावर्षीच्या शोभा यात्रेत कोणती संकल्‍पना असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. कोरोनामुळे गेली दोन वर्ष बंद असलेली ही शोभायात्रा यंदा पुन्हा त्याच जोशात निघणार असून, नववर्ष यात्रेच्या तयारीसाठी बैठकांना वेग आला आहे. आतापर्यंत नववर्षाच्या शोभायात्रेतून वेगवेगळे संदेश देण्यात येत होते. यामध्ये सर्वधर्म समभाव, निवृत्त सैनिक आणि हुतात्‍मा सैनिकांच्या कुटुंबांचा सत्कार, पर्यावरण समतोल याबाबत जनजागृती करण्‍यात आली. यंदा गुढी पाडव्‍याच्‍या दिवशी शोभायात्रा आचोळे तलाव, सेंट्रल पार्क, नालासोपारा पश्चिम येथून संध्याकाळी ४ वाजता सुरू होणार आहे.