ज्येष्ठ नागरिकांचा तारा संस्थांनकडून सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिकांचा तारा संस्थांनकडून सन्मान
ज्येष्ठ नागरिकांचा तारा संस्थांनकडून सन्मान

ज्येष्ठ नागरिकांचा तारा संस्थांनकडून सन्मान

sakal_logo
By

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : समाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजस्थान येथील तारा संस्थान या संस्थेच्या वतीने ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा नुकताच सन्मान करण्यात आला. भाईंदर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम भाईंदर पश्चिम येथील विसावा विरंगुळा केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी ७४ ज्येष्ठ नागरिकांना पगडी, शेला व माळ घालून तसेच त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पेडणेकर, सचिव सीताराम नाईक, खजिनदार शोभना मंत्री, व्यवस्थापक चंद्रकांत हरदास व कार्यकारिणी सदस्य चंद्रहास्य लाड त्याचप्रमाणे माजी नगरसेवक डॉ. सुशीलकुमार अग्रवाल, अजित पाटील तसेच लेखक दिग्दर्शक सदाशिव चव्हाण यांचाही संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला तारा संस्थानचे कैलाश प्रजापती, शैवानी राऊत, शिवशंकर जंगम, हेमलता अग्रवाल आदी उपस्थित होते.