नाल्यातून काढलेला गाळ रस्त्यावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाल्यातून काढलेला गाळ रस्त्यावरच
नाल्यातून काढलेला गाळ रस्त्यावरच

नाल्यातून काढलेला गाळ रस्त्यावरच

sakal_logo
By

भांडुप, ता. १३ (बातमीदार) ः भांडुप पश्चिम परिसरातील एलबीएस मार्गावर कुकरेजा कॉप्लेक्ससमोरील नाल्याची नुकतीच सफाई करण्यात आली. त्‍यानंतर या नाल्‍यातील गाळ तसाच नाल्याच्या बाजूला रस्‍त्‍यावर पडून आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनांच्‍या वर्दळीमुळे गाळ इतरत्र पसरत आहे. याचा त्रास नागरिकांना होत असून हा गाळ तातडीने उचलावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
नालेसफाईनंतर येथे पडून असलेल्‍या गाळासंदर्भात पालिकेकडे तक्रार करूनही तो गाळ उचलला नसल्‍याचे येथील नागरकांचे म्‍हणणे आहे. तसेच हा गाळ आता पुन्‍हा नाल्‍यात जात असून पालिकेने केलेला खर्च वाया जात असल्‍याने नागरिक संताप व्‍यक्‍त करत आहेत. हा गाळ तातडीने उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत.