राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस
राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस

राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांना हद्दपारीची नोटीस

sakal_logo
By

ठाणे, ता. १३ (वार्ताहर) : आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या कथित ऑडिओ क्लिपवरून ठाणे पालिकेच्या मुख्यालयासमोरच सहायक आयुक्तांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस बजावली आहे.

ठाणे पालिका सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला प्रकरणात नौपाडा पोलिस ठाण्यात अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विशांत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी ठाणे न्यायालयाने चारही जणांचा २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या संशयित आरोपींना नौपाडा पोलिस ठाण्याचे सहायक आयुक्त विलास शिंदे यांनी हद्दपारीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामध्ये त्यांना ठाणे, मुंबई, मुंबई उपनगरे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यांच्या हद्दीतून दोन वर्षांकरिता हद्दपार का करू नये याबाबत कारणे दाखवा, अशी नोटीस बजावली आहे.