वाचन मंदिराच्या हिरक महोत्सवात ब्राह्मण समाजाचा लेखाजोखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचन मंदिराच्या हिरक महोत्सवात ब्राह्मण समाजाचा लेखाजोखा
वाचन मंदिराच्या हिरक महोत्सवात ब्राह्मण समाजाचा लेखाजोखा

वाचन मंदिराच्या हिरक महोत्सवात ब्राह्मण समाजाचा लेखाजोखा

sakal_logo
By

भिवंडी, ता. १४ (बातमीदार) : भिवंडीतील वाचन मंदिर वाचनालय १६० वा वर्धापनदिन म्हणजेच शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने भिवंडी आणि माझा समाज या विषयांतर्गत आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते यशवंत कुंटे यांनी शहरातील ब्राह्मण समाजाचा आढावा घेत लेखाजोखा मांडला.

भिवंडीतील वाचन मंदिर संस्था आपले हीरकमहोत्सवी वर्ष साजरे करताना एका अभिनव उपक्रमाद्वारे शहरातील सर्व समाजाशी नाळ जुळवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानिमित्ताने दर महिन्याला भिवंडी आणि माझा समाज या विषयावर विविध समाजातील अभ्यासकांकडून प्रत्येक समाजाचा लेखाजोखा आणि त्यांनी शहरासाठी दिलेले योगदान याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
वाचन मंदिराच्या या उपक्रमाची सुरुवात रविवारी (ता. १२) ब्राह्मणआळी येथील टिळक मंदिर येथे सरस्वती पूजनाने झाली. या प्रसंगी मंचावर संस्थेचे कार्यवाह किशोर नागावेकर होते; तर सहकार्यवाह मिलिंद पळसुले व खजिनदार उज्ज्वल कुंभार यांच्यासह परिसरातील ब्राह्मण समाजातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना प्रमुख वक्ते यशवंत कुंटे यांनी सतराव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत शहरातील ब्राह्मण समाजाचा आढावा घेत लेखाजोखा मांडला. ऐतिहासिक संदर्भ देत स्वातंत्र्य चळवळीतील ब्राह्मण समाजाचे योगदान, शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभिनव भारतचे कार्य, लोकमान्य टिळकांची भिवंडी भेट आणि त्यांचे व्याख्यान तसेच नगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवडून येण्याची परंपरा, त्याचप्रमाणे ब्राह्मण महिलांनी सुरू केलेले भगिनी मंडळ ही संस्था आणि या संस्थेचे मुलींचे वसतिगृह अशा सर्व विषयांचा, शैक्षणिक संस्थांचा व सामाजिक कार्याचा आढावा घेतला.