सांगली जिल्हा विकास संघ संघटनेचा वर्धापनदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगली जिल्हा विकास संघ संघटनेचा वर्धापनदिन
सांगली जिल्हा विकास संघ संघटनेचा वर्धापनदिन

सांगली जिल्हा विकास संघ संघटनेचा वर्धापनदिन

sakal_logo
By

चेंबूर, ता. १४ (बातमीदार) ः सांगली जिल्हा विकास संघ संघटनेचा दहावा वर्धापनदिन सोहळा गोवंडी येथे पार पडला. या वेळी सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सांगलीकरांना ‘सांगलीरत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने पोलिस, अभिनय, संगीत, गायन या क्षेत्रात तसेच कोरोना काळात समाजकार्य केलेल्यांचा गौरव केला. यात बॉक्सिंगमध्ये राज्य स्तरावर सुवर्णपदक पटकावलेली जान्हवी वाघमारे, डॉ. सचिन मिटकरी, संजय सोनटक्के, संजीव लांडगे यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाला केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार अबू आझमी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशांक शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष संभाजी लोखंडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चव्हाण यांनी केले.

वडाळ्यात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान
वडाळा, ता. १४ (बातमीदार) ः वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यावर नियंत्रण मिळविण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘हाथ से हाथ जोडो’ या अभियानाच्या अनुषंगाने मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या निर्देशानुसार वडाळा येथे या अभियानाची सुरुवात केली आहे. विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १८१ (१८७) च्या माजी नगरसेविका पुष्पा कोळी यांनी कोरबा मिठागर विभागातील आनंदवाडी, छोटी आनंदवाडी, राजीव गांधी नगर, पंचशील नगर, गौतम नगर, बरकत अली नगर येथे या अभियानांतर्गत नागरिकांची भेट घेतली.

आरोग्य तपासणी शिबिर
घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः मुंबई शहरात विविध विकासकामांची बांधकामे होत असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण वाढले आहे. या प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होत आहे. या पार्श्वभूमीवर विक्रोळी येथील कन्नमवार नगर परिसरात धुळीमुळे हैराण झालेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. योगेश भालेराव व तेजस्विनी ढसाळ यांच्या वतीने नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी विभागातील २७५ नागरिकांनी याचा लाभ घेतला.