पनवेलमध्ये ५३ चालकांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमध्ये ५३ चालकांवर कारवाई
पनवेलमध्ये ५३ चालकांवर कारवाई

पनवेलमध्ये ५३ चालकांवर कारवाई

sakal_logo
By

पनवेल, ता. १४ (वार्ताहर) : पनवेल वाहतूक शाखेने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. पनवेल वाहतूक शाखेने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल येथील कोळखे गाव येथील ब्लॅक स्पॉटवर सोमवारी (ता. १३) वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३ चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २३,७०० रुपयांचा दंड वसूल केला. या वेळी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम पाळा कारवाई टाळा, असा संदेशदेखील वाहनचालकांना दिला.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पनवेल येथील कोळखे गाव येथे नियमित अपघातांच्या घटना घडत असतात. या अपघातांना वाहनचालकांचा निष्काळजीपणादेखील कारणीभूत ठरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पनवेल वाहतूक शाखेचे प्रभारी संजय नाळे यांनी कोळखे गाव येथील ब्लॅक स्पॉटवर सोमवारी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे, सीट बेल्ट न लावणारे, काळ्या काचा लावणारे, फॅन्सी नंबर प्लेट आदींचा समावेश असून एकूण ५३ वाहन चालकांवर पनवेल वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली.