कोचरे गावात आरोग्य शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोचरे गावात आरोग्य शिबीर
कोचरे गावात आरोग्य शिबीर

कोचरे गावात आरोग्य शिबीर

sakal_logo
By

किन्हवली, ता.१५ (बातमीदार) ः किन्हवली महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या कोचरे गावात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेऊन आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळाचे अरविंद भानुशाली महाविद्यालया अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कोचरे(बु.) गाव दत्तक घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

क्रिस्टलकेअर हॉस्पिटल आसनगाव येथील डॉ. वसंतराव सानप व त्यांचे सहकारी यांनी ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधे दिली. टॅलेंट इंडियाचे प्रतिनिधी प्रवीण सावंत यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले. शिबिरामध्ये नेत्र तपासणी, कान, नाक व घसा तपासणी, हृदयरोग व बालरोग तज्ञांनी रुग्णांना वैद्यकीय सल्ला दिला. हॉस्पिटल व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संचालक डॉ. सुनील भानुशाली यांनी पुढाकार घेतला. शिबिराचे उद्घाटन विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष खंडू विशे यांचे हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे सचिव दत्तात्रय करण, प्रभारी प्राचार्य डॉ.अजयकुमार पटेल, कोचरे गावचे उपसरपंच भास्कर निरगुडा, माजी सरपंच जयवंत केव्हारी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरामध्ये १८५ ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.