बांदोडकर महाविद्यालय मानांकन प्राप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदोडकर महाविद्यालय मानांकन प्राप्त
बांदोडकर महाविद्यालय मानांकन प्राप्त

बांदोडकर महाविद्यालय मानांकन प्राप्त

sakal_logo
By

ठाणे, ता. १५ : विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे स्वयत्तता बहाल करण्यात आली आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड यांच्यामार्फत महाविद्यालयाला आयएसओ/ २१००१ः२०१८ मानांकन प्राप्त झाले आहे.

महाविद्यालयातील विविध कार्य प्रणालीच्या दर्जाची पातळी तपासण्याकरिता मानांकनाची आवश्यकता असते. महाविद्यालयातील कार्यप्रणाली आयएसओ या मानकानुसार कार्यरत आहे, याची तपासणी आयएसओ यांच्या संमतीने १४ व १५ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन समितीकडून करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाच्या विविध प्रक्रिया जसे अध्ययन - अध्यापन प्रक्रिया, प्रशासकीय प्रक्रिया, ग्रंथालय विभाग, परीक्षा विभाग, प्रवेश विभाग, विद्यार्थी सहाय्य विभाग इत्यादी विभागांचे या समितीने मूल्यांकन केले. या महविद्यालयाने आयएसओतर्फे नमूद करण्यात आलेल्या निकषांची पूर्तता केल्याने पुढील तीन वर्षांसाठी हे मानांकन २०२३ ते २०२६ या कालावधीकरिता प्रदान करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात या पद्धतीचे मानांकन मिळवणारी बांदोडकर ही दुसरी संस्था आहे. या मानांकनाकरिता डॉ. कल्पिता मुळे आणि आणि डॉ. जयश्री पवार या प्रमुख समन्वयक म्हणून भूमिका बजावत होत्या.