गाळे येथे रोटरीतर्फे स्मशानभूमीची पुनर्बांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाळे येथे रोटरीतर्फे स्मशानभूमीची पुनर्बांधणी
गाळे येथे रोटरीतर्फे स्मशानभूमीची पुनर्बांधणी

गाळे येथे रोटरीतर्फे स्मशानभूमीची पुनर्बांधणी

sakal_logo
By

वाडा, ता. १५ (बातमीदार) : रोटरीने वाडा येथील गाळे गाव दत्तक घेतले आहे. गावातील स्मशानभूमी अतिशय जीर्ण अवस्थेत होती आणि त्यामुळे ती निरुपयोगी झाली होती. गावकऱ्यांनी तिच्या पुनर्बांधणीसाठी मदतीची विनंती केली होती. त्यानुसार रोटरी क्लब ऑफ मुंबई वर्सोवाने प्रकल्प योजनांमध्ये त्याचा समावेश केला होता. क्लब सदस्यांना आवाहन केल्यानंतर रोटेरियन अशोक गुप्ता आणि प्रगती गुप्ता या दाम्पत्याने त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. हे काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी २०२२ सालामध्ये रोटेरियन अतुल अग्रवाल यांच्या सहकार्याने गावातील १८ शेतकऱ्यांना ठिबकसिंचन योजना देण्यात आली होती. त्याचेदेखील औपचारिक उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी रोटरी क्लब ऑफ मुंबई वर्सोवाचे अध्यक्ष मनीष खेमका, सचिव सुशील डागा, सदस्य अशोक गुप्ता, प्रीती गुप्ता, राजेश अग्रवाल, अंजू अग्रवाल, राजेश चौधरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.