Mon, March 27, 2023

जयवंत उर्फ दादा वाडेकर यांचे निधन
जयवंत उर्फ दादा वाडेकर यांचे निधन
Published on : 15 March 2023, 11:49 am
वाडा, ता. १५ (बातमीदार) : वाडा शहरातील रहिवासी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जयवंत ऊर्फ दादा वाडेकर (वय ८२) यांचे मंगळवारी (ता. १४) सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी (ता. १५) सकाळी वाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शेती उपयोगी अनेकविध अवजारे बनवून शेतकऱ्यांचे काम सुलभ करणारे व शेतीला औद्योगिकीकरणाची जोड देणारे कृषी प्रेणेते म्हणून दादा वाडेकरांकडे पाहिले जाते. त्यांच्या अंत्ययात्रेस विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.