Sat, April 1, 2023

भाऊराव पतंगराव यांना मातृशोक
भाऊराव पतंगराव यांना मातृशोक
Published on : 15 March 2023, 11:18 am
किन्हवली, ता. १५ (बातमीदार) ः सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता भाऊराव रामचंद्र पतंगराव यांच्या मातोश्री सुमित्रा रामचंद्र पतंगराव (वय ८५) यांचे ११ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
सुमित्रा पंतगराव यांच्या पश्चात पाच विवाहित मुले, सुना, नातवंडे, पतवंडे, पुतणे, दीर, भावजई असा मोठा संयुक्त परिवार आहे. २१ मार्च रोजी शिवाजीनगर, किन्हवली येथील राहत्या घरी त्यांचे उत्तरकार्य आयोजित करण्यात आले आहे.