बलात्काराच्या आरोपाखालील आरोपी दोषमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बलात्काराच्या आरोपाखालील आरोपी दोषमुक्त
बलात्काराच्या आरोपाखालील आरोपी दोषमुक्त

बलात्काराच्या आरोपाखालील आरोपी दोषमुक्त

sakal_logo
By

ठाणे, ता. १५ (वार्ताहर) ः अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तरुणाची विशेष पोक्सो न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती व्ही. व्ही. वीरकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. पुराव्याअभावी न्यायमूर्तींनी तरुणाला निर्दोष ठरवले. प्रदीप हिंगोले असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा नांदेड येथील रहिवासी आहे.

आरोपी प्रदीप याचे नातेवाईक तक्रारदार मुलीच्या घराशेजारी राहत होते. त्यांची सतत भेट झाल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. तेव्हा प्रदीपने मुलीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला; पण मुलीने आपण सज्ञान होईपर्यंत वाट पाहण्यास सांगितले. त्याच दरम्यान १६ डिसेंबर २०१७ रोजी प्रदीप मुलीला घेऊन नांदेड येथे गेला. परतीच्या प्रवासात त्याने मुलीशी दोन वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप मुलीच्या वतीने करण्यात आला होता. मुलीच्या घरच्यांनी तक्रार केल्यानंतर प्रदीपला अटक करण्यात आली होती.
पण, सदर प्रकरणात आरोपी आणि मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. मुलगी स्वतः त्याच्यासोबत नांदेडला गेली होती. त्यामुळे अपहरण झाल्याचे सिद्ध होत नाही. या प्रेमप्रकरणाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. दोघांनी लग्न केले होते. दोघे पती पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते. तपास यंत्रणांना मुलगी १८ वर्षे वयापेक्षा लहान असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आले. असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती वीरकर यांनी प्रदीप हिंगोले याला दोषमुक्त केले.