अभिनेते समीर खाखर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेते समीर खाखर यांचे निधन
अभिनेते समीर खाखर यांचे निधन

अभिनेते समीर खाखर यांचे निधन

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ ः अभिनेते समीर खाखर यांचे आज (ता. १५) वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. ते बोरिवली येथील आयसी कॉलनीत एकटेच राहत होते. त्यांची पत्नी अमेरिकेत राहते.
भाऊ गणेश खाखर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, की समीर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत होती. मंगळवारी त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे ते बेशुद्ध पडले. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. आज पहाटे त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. समीर यांनी त्यांच्या ३८ वर्षांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले. समीर यांनी ‘नुक्कड’ या ८० च्या दशकातील प्रसिद्ध मालिकेमध्ये ‘खोपडी’ ही भूमिका साकारली. सलमान खानच्या ‘जय हो’मधील भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. ‘परिंदा’, ‘इना मीना डीका’, ‘दिलवाले’, ‘राजा बाबू’, ‘आतंक ही आतंक’, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’, ‘अव्वल नंबर’, ‘प्यार दीवाना होता है’, ‘हम हैं कमाल के’ या चित्रपटांमध्ये समीर यांनी काम केले. काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘फर्जी’ या वेबसीरिजमध्येदेखील समीर यांनी काम केले आहे.