
कांदिवली येथील एकाच सोसायटीमध्ये दोघांच्या आत्महत्येने खळबळ
एकाच सोसायटीतील
दोघांच्या आत्महत्येने खळबळ
महिलेने गळफास घेतला; तरुणाने मारली उडी
अंधेरी, ता. १५ (बातमीदार) ः कांदिवलीतील एकाच सोसायटीमध्ये दोघांनी आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये मीना मारुथुवर (५२) आणि अजिंक्य राजपूत (२१) यांचा समावेश आहे. मीना यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अजिंक्यने इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. कांदिवली पोलिसांनी दोन स्वतंत्र अपमृत्यूंची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.
कांदिवलीतील लालजीपाडा परिसरातील जय भारत सहकारी सोसायटीत मीना आणि अजिंक्य राहत होते. अजिंक्यने आज पहाटे ५ वाजता आत्महत्या केली. कांदिवली पोलिसांनी त्यांच्या वडिलांसह काकांची जबानी घेतली असून त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. अजिंक्यकडे सुसाईट नोट सापडलेली नसल्याने त्याच्या आत्महत्येच्या कारणांचा खुलासा होऊ शकलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. जय भारत सोसायटीतच राहणाऱ्या मीना यांनीही आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. मीना लहानसान कारणांवरून आपल्या दोन मुलांशी वाद घालत असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा पत्नीबरोबर रुग्णालयात गेला होता. त्या वेळी मीना एकट्याच घरी होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांची मुले घरी आल्यानंतर त्यांनी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. दोन्ही घटनांबाबत पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.