ठाण्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांत वाढ
ठाण्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांत वाढ

ठाण्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांत वाढ

sakal_logo
By

ठाणे, ता. १५ : ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येने उसळली घेतली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल २४ रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये १४ रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले आहेत. आठवडाभरात वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे आता सक्रिय रुग्णांचा आकडा शंभराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. निम्म्याहून अधिक सक्रिय रुग्ण ठाणे पालिका क्षेत्रात उपचारार्थ दाखल आहेत.
जिल्ह्यात शनिवारी (ता. ११) १६ रुग्ण तर सोमवारी (ता. १३) १३ रुग्ण नोंदवले गेले. त्यानंतर बुधवारी (ता. १५) २४ नव्या रुग्णांची भर पडली. या वाढत्या रुग्णसंख्येने सक्रिय रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. ती संख्या आता ९८ इतकी झाली आहे. पालिका क्षेत्रात नोंदवलेल्या १४ नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्ण संख्या ५८ वर गेली आहे. म्हणजे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण पालिका क्षेत्रात असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.