आदिवासी कुटूंबाला प्रशासनाकडून न्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी कुटूंबाला प्रशासनाकडून न्याय
आदिवासी कुटूंबाला प्रशासनाकडून न्याय

आदिवासी कुटूंबाला प्रशासनाकडून न्याय

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १६ (वार्ताहर) : आई-वडील अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन पनवेल तालुक्यातील मौजे हेदुटवणेतील अनंता पोकळा यांच्या नावावरील ३२ गुंठे जमीन बळकावण्यात आली होती; पण पनवेलचे तहसीलदारांनी पुढाकार घेऊन या पीडित कुंटुबाला न्याय मिळवून दिला आहे.
२०११ मध्ये बेकायदा ९९ वर्षांचा भाडेकरार करून जागेवर मौजे हेदूटवणेतील अनंता पोकळा यांच्या नावावरील ३२ गुंठे जमिनीवर सिंग नामक व्यक्तीने कॉरीवरील लोकांसाठी घरे, गाड्या दुरुस्तीसाठी गॅरेज, गाई, म्हशीचा गोठा बांधला होता; पण ही जमीन बिगरआदिवासी व्यक्तीच्या नावे होणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर २०१६ मध्ये खरेदी-विक्रीचा साठेकरार करून कब्जा केला गेला होता. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पनवेल ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम कोरडे यांनी नि:पक्षपातीपणे चौकशी करून जाब-जबाब नोंदवला होता. तसेच हा विषय अतिशय संवदेनशील असल्याने सिंग कुटुंबीयांची बाजू ऐकून घेऊन वादग्रस्त जागेचे हस्तांतर बेकायदा असल्याचे सिद्ध केले होते.