Tue, March 21, 2023

सुजाता झंवर यांचे निधन
सुजाता झंवर यांचे निधन
Published on : 16 March 2023, 10:51 am
मुरबाड, ता. १६ (बातमीदार) ः महाराष्ट्र प्रदेश महेश्वरी महिला कोकण विभागाच्या सचिव सुजाता झंवर (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (ता. १६) मुरबाड शहरात मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती डॉ. किरण झंवर, विवाहित मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी कोकण विभागातून महेश्वरी महिला समाजाच्या पदाधिकारी व मुरबाड तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.