काळू नदीच्या पात्रात मांसाचे तुकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळू नदीच्या पात्रात मांसाचे तुकडे
काळू नदीच्या पात्रात मांसाचे तुकडे

काळू नदीच्या पात्रात मांसाचे तुकडे

sakal_logo
By

किन्हवली, ता. १६ (बातमीदार) ः येथील काळू नदीच्या पात्रात मांसाचे तुकडे आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जवळच्‍या दहिवली गावाच्या विहिरीत हे तुकडे वाहत गेले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याची प्रशासनाला माहिती मिळताच तलाठी पी. व्ही. जाधव, ग्रामसेवक आर. टी. इसामे यांनी पंचनामा करून तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर केला. अहवाल सादर होताच गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, तालुका पाणीपुरवठा अधिकारी जाधव, माजी पंचायत समिती सदस्य पद्माकर वेखंडे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र आव्हाड, आरोग्य अधिकारी डॉ. रूपाली शेडगे यांनी उपस्थित राहून प्रशासकीय पातळीवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून नदीपात्र स्वच्छ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कर्मचारी तसेच आशा वर्कर यांनी गावात पिण्याच्या पाण्यासंदर्भात जनजागृती केली आहे. याआधीही या परिसरात असे अनेक प्रकार घडले असून कधी काडतुसे, कधी मुदत संपून गेलेली शितपेये, मसाले टाकणे असे गंभीर प्रकार घडले असून पोलिस प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.