नेस्को कोविड केंद्रातील भंगार विक्रीतून ७८ लाखांची कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेस्को कोविड केंद्रातील 
भंगार विक्रीतून ७८ लाखांची कमाई
नेस्को कोविड केंद्रातील भंगार विक्रीतून ७८ लाखांची कमाई

नेस्को कोविड केंद्रातील भंगार विक्रीतून ७८ लाखांची कमाई

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ ः कोरोना महामारीवेळी अधिकाधिक रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेकडून मुंबईत ठिकठिकाणी कोविड केंद्र सुरू करण्यात आली होती. आता कोरोनाची लाट ओसरल्यानंतर ही कोविड केंद्र बंद करण्यात आली. त्यापैकी गोरेगावच्या नेस्को कोविड केंद्रातील भंगार साहित्य विक्रीतून मुंबई महापालिकेच्या तिजोरीत ७८ लाख रुपये जमा होणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कस्तुरबा, सेव्हन हिल्स रुग्णालयातील सुविधा अपुरी पडू लागल्याने मुंबईत अनेक ठिकाणी कोविड केंद्र उभारून रुग्णांना उपचार, तसेच विलगीकरणाची सुविधा देण्यात आली. त्यासाठी गोरेगावच्या नेस्को जम्बो कोविड केंद्र उभारण्यासाठी प्रामुख्याने स्टील, अॅल्युमिनियम, सिमेंट वॉल पॅनेल्सचा वापर करण्यात आला आहे; परंतु आता कोविडची लाट ओसरल्याने हे सेंटर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सेंटरसाठी उभारलेले मंडपाचे साहित्य काढण्यात आले आहे. सद्यस्थितीत पुन्हा सेंटर उभारणीची शक्यता नसल्याने तसेच हे साहित्य अजून गंज लागून खराब होण्यापूर्वीच याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासर्व साहित्यासाठी महापालिकेने सुमारे ८३ लाख रुपयांचा महसूल अपेक्षित धरला होता; परंतु प्रत्यक्षात निविदा मागवल्यानंतर यासाठी गॅस ट्रेडिंग कंपनीने कमी बोली लावून ७८ लाख रुपयांमध्ये हे भंगार सामान मिळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.