डंपरची सायकलस्‍वार कामगाराला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डंपरची सायकलस्‍वार कामगाराला धडक
डंपरची सायकलस्‍वार कामगाराला धडक

डंपरची सायकलस्‍वार कामगाराला धडक

sakal_logo
By

मनोर, ता. १६ (बातमीदार) : बोईसर रेल्वे उड्डाणपूल उतारावर वळण घेत असलेल्या डम्परने गुरुवारी (ता. १६) दुपारी सायकलस्‍वार कामगाराला धडक दिली. या अपघातात कामगार गंभीर जखमी झाला आहे. जखमी कामगाराला बेटेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारांदरम्यान कामगार अत्यवस्थ झाल्याने त्‍याला मुंबईला हलवण्यात आले आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी काही काळ वाहतूक रोखून धरल्याने वाहतूक कोंडी झाली होती. आनंद कुमार प्रसाद (वय-३२) असे अपघातात जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. गुरुवारी दुपारी तो विराज कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाला होता. बोईसर रेल्वे उड्डाणपुलाच्या उतारावर पालघरच्या दिशेने वळणाऱ्या भरधाव डम्परने त्‍याला धडक दिली. या अपघातात आनंद कुमार प्रसाद गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघातामुळे संतप्त नागरिकांनी घटनास्थळी वाहतूक रोखून धरली होती. या भागात दिवस-रात्र अवजड वाहनांमधून सुरू असलेल्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.