Thur, March 30, 2023

कांदिवलीतील वकील मारहाणीचे ठाण्यात पडसाद
कांदिवलीतील वकील मारहाणीचे ठाण्यात पडसाद
Published on : 17 March 2023, 3:57 am
मुंबई : कांदिवली पोलिस ठाण्यात वकिलाला मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध आज (ता. १७) ठाण्यातील कामगार न्यायालयातील वकिलांच्या संघटनेने केला. बोरिवलीमधील वकील पृथ्वीराज झाला यांना पोलिस ठाण्यातील निरीक्षकांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काल (ता. १६) बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयातील वकिलांनी ‘काम बंद’ आंदोलन करून निषेध व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर आज ठाण्यातही या घटनेचे पडसाद उमटले. कामगार न्यायालयातील वकिलांनी न्यायालयात गैरहजर राहून निषेध व्यक्त केला. तसेच संबंधित पोलिस निरीक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी संघटनेने ठरावामार्फत केली आहे. पोलिस निरीक्षक हेमंत गीते यांची बदली करण्यात आली असून विभागीय चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.