Mon, March 20, 2023

चार अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार
चार अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार
Published on : 18 March 2023, 10:40 am
उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार उल्हासनगर महानगरपालिकेतील चार अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे. पालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडे प्रभाग समिती एकचे प्रभारी सहायक आयुक्तपद, कर निर्धारक व संकलक जेठानंद ताराचंदानी यांच्याकडे प्रभाग समिती दोनचे सहायक आयुक्तपद, मालमत्ता कर विभागातील लिपिक छाया डांगळे यांच्याकडे जनसंपर्क अधिकारीपद आणि पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता परमेश्वर बुडगे यांच्याकडे प्रभारी अभियंतापदाचा पदभार सोपवण्यात आला आहे.