
टेटवालीत हस्तकला कार्यशाळा उत्साहात
विक्रमगड, ता. १८ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील टेटवाली गावात वस्त्र मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे हस्तकला कार्यशाळा २४ जानेवारी २०२३ पासून घेण्यात आली. ५० दिवस हे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत ३० कारागिरांना बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण भोपाळ येथील अंकिता चंद्रवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. बाबुराव भुरकुड यांनी मुख्य कारागीर म्हणून काम पाहिले. या प्रसंगी वस्त्र मंत्रालय भारत सरकारचे वरिष्ठ सहसंचालक एस. आर. मसराम, खादी उद्योगाचे नित्यानंद पाटील, उद्योगप्रमुख मुकेश पाध्या, मंजी चव्हाण, ओंदे महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. भीमराव बनसोडे, प्रा. राहुल बनसोडे, सरपंच ज्योती माढा, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी सहसंचालक मसराम, अंकिता चंद्रवंशी, नित्यानंद पाटील, मुकेश पाटील, डॉ. बनसोडे, बाबुराव भुरकुड, सूरज डिग्रेसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व कारागिरांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.