Wed, March 22, 2023

ब्रह्मांड कट्ट्याचा आज वर्धापनदिन सोहळा
ब्रह्मांड कट्ट्याचा आज वर्धापनदिन सोहळा
Published on : 18 March 2023, 12:36 pm
ठाणे, ता. १८ : ब्रह्मांड कट्ट्यातर्फे रविवारी (ता. १९) सायंकाळी ६ ते ९.३० या वेळेत ब्रह्मांड कट्ट्याचा १५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. सांजस्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृहात याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सावनकुमार सुपे प्रस्तुत ‘सुनो मेरी आवाज’ हा हिंदी, मराठी गीतांचा सुरेल कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. सर्व रसिकांनी वर्धापनदिन सोहळ्याचा आनंद घ्यावा व ब्रह्मांड कट्ट्याच्या उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन संस्थापक राजेश जाधव व अध्यक्ष महेश जोशी यांनी केले आहे.