तरुणीवर अतिप्रसंग करत ठार मारण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणीवर अतिप्रसंग करत ठार मारण्याचा प्रयत्न
तरुणीवर अतिप्रसंग करत ठार मारण्याचा प्रयत्न

तरुणीवर अतिप्रसंग करत ठार मारण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

अलिबाग, ता. १८ (बातमीदार) : उसर येथील गेल कंपनीतील कंत्राटी कामगाराने एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करून अन्य साथीदारांच्या मदतीने तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चिंचोटी गाव ते चिंचोटी स्थानकाच्या दरम्यान असलेल्या मैदानाजवळ घडली. सूरजकुमार उपेंद्र पासवान (वय २२) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळचा पंजाब राज्यातील असून सध्या अलिबाग तालुक्यातील उसर येथे राहत आहे. शुक्रवारी सायंकाळी एक तरुणी कामावरून घरी जात असताना आरोपी व त्याच्या साथीदारांनी तरुणीचे तोंड रुमालाने दाबत तिला जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी आरडाओरड केली. त्याच वेळी तरुणीचा गळा ओढणीने आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न आरोपींनी केला, परंतु तरुणीचा आवाज ऐकून पादचारी तिच्या मदतीला धावून आल्याने त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. या वेळी ग्रामस्थांनी एका आरोपीचा पाठलाग करत त्यास चोप दिला. या घडलेल्या प्रकारामुळे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पाहणी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.