वारसा हक्कांच्या लाभाची बैठकीतून माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारसा हक्कांच्या लाभाची बैठकीतून माहिती
वारसा हक्कांच्या लाभाची बैठकीतून माहिती

वारसा हक्कांच्या लाभाची बैठकीतून माहिती

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १९ (वार्ताहर): पनवेल महापालिकेतील सर्व कायम सफाई कामगारांना वारसा हक्कांच्या लाभाबाबत माहिती देण्याकरिता उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली होती. या वेळी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने लाड -पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत केलेल्या सुधारित तरतुदीबाबत सफाई कामगारांना माहिती देण्यात आली.
पनवेल महापालिकेच्या आस्थापनेवरील आरोग्य विभागात कार्यरत कायम सफाई कामगारांना लाड -पागे समितीअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वारसा हक्काबाबत, सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त झाल्यावर, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र झाल्यास, सेवेत असताना दिवंगत झाल्यावर मिळणाऱ्या लाभांबाबत माहिती देण्यात आली. या अनुषंगाने सफाई कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची दक्षता, नियुक्ती प्राधिकरण समितीच्या जबाबदाऱ्या याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. महापालिकेने २०१८ पासून लाड-पागे शिफारशीखाली ४६ वारसदारांना नोकरीचा लाभ दिला आहे. तसेच महापालिकेने अनुकंपाखाली २५ वारसदारांना नोकरीचा लाभ दिला आहे. यावेळी सहायक आयुक्त नामदेव पिचड, स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे, प्रभाग अधिकारी दीपक शिलकन, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, रोशन माळी, सर्व स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी उपस्थित होते.