Wed, March 29, 2023

नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त छायाचित्र स्पर्धा
नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त छायाचित्र स्पर्धा
Published on : 19 March 2023, 11:00 am
कल्याण, ता. १९ (बातमीदार) : कल्याण पश्चिममध्ये गुढीपाडव्याला निघणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त कल्याण संस्कृती मंच व रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणतर्फे स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त ‘एक फोटो आठवण’ या विषयावर छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या वर्षीच्या स्वागतयात्रेचे फोटो आयोजकांना १२ इंच लांबी आणि १० इंच रुंदी या आकारामध्ये सकाळी १०.३० ते ५.०० या वेळेत ३१ मार्च २०२३ पर्यंत (रविवार सोडून) पाठवावे. बुधकर पब्लिसिटी, ॲाफिस नं १०६, पहिला मजला, उपेंद्र बिल्डिंग, महालक्ष्मी हॉटेलच्या वर, स्टेशन रोड, कल्याण (प) या पत्त्यावर छायाचित्रे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमलेल्या फोटोंचे प्रदर्शन एप्रिल महिन्यात कल्याण येथे भरवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.