बागेश्वर धामच्या मंदिराचे आज भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बागेश्वर धामच्या मंदिराचे आज भूमिपूजन
बागेश्वर धामच्या मंदिराचे आज भूमिपूजन

बागेश्वर धामच्या मंदिराचे आज भूमिपूजन

sakal_logo
By

भिवंडी, ता. १९ (बातमीदार) : देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पीठाधीश्वर बागेश्वर धाम सरकार यांचे मंदिर व आश्रम भिवंडीत उभारण्यात येणार आहे. दिव्य बालाजी सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते अंजुरदिवे येथील इंडियन कॉर्पोरेशन माईलस्टोन येथे सोमवारी (ता. २०) दुपारी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उद्योगपती रूद्र प्रताप त्रिपाठी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या संतपीठाच्या माध्यमातून शेकडो वर्षांपासून नागरिकांचे दु:ख व समस्या निवारण करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. ६ व ७ नोव्हेंबर रोजी बागेश्वर धामकडून भिवंडीत दिव्य बालाजी दरबार भरवण्यात आला होता. त्या वेळी उद्योगपती रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी इंडियन कॉर्पोरेशन माईल स्टोन येथे बागेश्वर धामचे मंदिर व आश्रम उभारण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार आज भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.