स्टेंट प्रत्यारोपण करून ७७ वर्षीय महिलेला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टेंट प्रत्यारोपण करून 
७७ वर्षीय महिलेला जीवदान
स्टेंट प्रत्यारोपण करून ७७ वर्षीय महिलेला जीवदान

स्टेंट प्रत्यारोपण करून ७७ वर्षीय महिलेला जीवदान

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : हृदयविकाराने त्रस्त असलेल्या ७७ वर्षीय महिलेला पारंपरिक शस्त्रक्रिया न करता अत्याधुनिक इन्ट्राव्हस्कुलर लिथोट्रिप्सी वापरून जीवदान देण्यात आले. बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात हृदयरोगतज्ञ डॉ. हेमंत खेमानी आणि भूलतज्ज्ञ डॉ. सागर येसाळे यांनी ही प्रक्रिया यशस्वी केली.
हृदयविकाराच्या रुग्णांच्या धमन्यांमध्ये कॅल्शियम किंवा अन्य घटकांचे ब्लॉकेज तयार झाल्यास प्रामुख्याने ओपन हार्ट सर्जरी केली जाते. बहुतांशवेळी रुग्णाचे वय पाहता नातेवाईक हा पर्याय स्वीकारत नाहीत, परंतु सदर महिलेची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी तंत्राने उपचार करण्याची योजना आखली. या प्रणालीमध्ये बलून कॅथेटरमध्ये (नळीसारखे उपकरण) इंटिग्रेटेड लिथोट्रिप्सी एमिटर असतात. हाताच्या वा पायाचा धमन्यांमध्ये चिरा देऊन बलून कॅथेटर हृदयापर्यंत पोहोचवला जातो. त्यात लिथोट्रिप्सी उत्सर्जित करणारे दाब वा लहरी तयार केल्या जातात. त्यामुळे धमन्यांमध्ये जमलेले फॅट्स अथवा चरबी दूर सारून रक्तप्रवाह सुरळीत केला जातो. तसेच कॅथेटरमधील फुगा फुगवला जातो, तेव्हा रक्तवाहिन्या उघडण्यास मदत करते, अशी माहिती हृदयविकारतज्ञ डॉ. हेमंत खेमाणी यांनी दिली.