‘नवीन शैक्षणिक धोरण’वर निबंध स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नवीन शैक्षणिक धोरण’वर निबंध स्पर्धा
‘नवीन शैक्षणिक धोरण’वर निबंध स्पर्धा

‘नवीन शैक्षणिक धोरण’वर निबंध स्पर्धा

sakal_logo
By

पालघर, ता. २० (बातमीदार) : नवनीतभाई शाह परिवर्तन ट्रस्ट आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण गट अशा तीन गटासह राज्यस्तरीय शिक्षक खुला गट अशा चार गटांत ही स्पर्धा होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणावर सर्वांगीण विचार मंथन व्हावे आणि नवनीतभाई शहा यांचा विचार वारसा पुढे चालवावा, याकरिता या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ३० एप्रिलपर्यंत प्राध्यापक विवेक कुडू, मराठी विभागप्रमुख सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर या पत्त्यावर निबंध पाठवावे. पाकिटावर नवनीत भाई ट्रस्ट परिवर्तन निबंध स्पर्धा असे लिहून आपला पूर्ण पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांकासह निबंधाच्या पहिल्या पानावर आपले नाव, निबंध स्पर्धेचा गट आणि इतर माहिती लिहावी, असे ट्रस्टतर्फे कळवण्यात आले आहे.