ज्वेलर्स व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्वेलर्स व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न
ज्वेलर्स व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न

ज्वेलर्स व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

अंधेरी, ता. २० (बातमीदार) : सुमारे ४४ लाखांच्या फसवणुकीनंतर मानसिक शोषण करून ज्वेलर्स व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी नासीर शेख, जैदी सय्यद आणि मुन्ना शेख यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

उमर अन्वरभाई मेमन हे मूळचे गुजरातच्या गांधीनगरचे रहिवासी असून ज्वेलर्स व्यापारी आहेत. सप्टेंबर महिन्यात वांद्रे येथे एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्यांची नासीर शेखशी ओळख झाली होती. तो मंत्रालयात पारपत्राचे काम करत असून अमेरिकेचा व्हिसा हवा असल्यास त्याला संपर्क साधण्यास सांगितले होते. त्यानुसार मेमन यांनी त्यांच्यासह भावासाठी अमेरिकेचा व्हिसा काढण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्यांनी नासीरच्या बँक खात्यात ४४ लाख रुपये जमा केले होते. नासीरने त्यांची ओळख जैदी आणि मुन्नाशी करून दिली होती. ते दोघेही त्याला याकामी मदत करत असल्याचे सांगितले होते; मात्र मुदतीत व्हिसाचे काम केले नाही. त्यामुळे दोन मित्रांच्या साक्षीने एक बॉण्ड लिहून देऊन त्यांना तीन धनादेश दिले होते; मात्र त्यांनी पैसे दिले नाहीत.

पैशांची मागणी केल्यानंतर ते तिघेही त्यांना शिवीगाळ करून त्यांना खोट्या गुन्ह्यांत अटकेची धमकी देऊ लागले होते. या तिघांकडून पैशांसाठी त्यांचे मानसिक शोषण सुरू होते. त्यातून नैराश्य आल्याने वांद्रे येथील लकी हॉटेलमध्ये त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हा प्रकार त्यांच्या मित्रांना समजताच त्यांनी त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.