निलेश गायकवाड यांना समाज रत्न पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निलेश गायकवाड यांना समाज रत्न पुरस्कार
निलेश गायकवाड यांना समाज रत्न पुरस्कार

निलेश गायकवाड यांना समाज रत्न पुरस्कार

sakal_logo
By

कासा, ता. २० (बातमीदार) : भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे पूज्य आचार्य भिसे विद्यालय कासा येथील क्रीडाशिक्षक डॉ. निलेश आत्माराम गायकवाड यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व सामाजिक कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार वितरण समारंभ विरार येथील भाऊसाहेब वर्तक सभागृह शेकडो लोकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर, संत रोहिदास सेवाभावी संस्था महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम, रक्तकर्ण किरण थोरात, भागिरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिनेश भोईर, सचिव अंकुश भोईर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तनुजा भोसले यांनी केले.