बुकी अनिल जयसिंघानी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुकी अनिल जयसिंघानी अटकेत
बुकी अनिल जयसिंघानी अटकेत

बुकी अनिल जयसिंघानी अटकेत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : अमृता फडणवीस लाच आणि खंडणीप्रकरणात आरोपी असलेल्या अनिक्षा जयसिंघानीचे वडील आणि सट्टेबाज अनिल जयसिघांनी याला गुजरातमध्ये मुंबई पोलिसांच्या विशेष मोहिमेंतर्गत अटक करण्यात आली आहे. गेल्या ७२ तासांपासून अनिल जयसिंघानी पोलिसांना चकवा देत होता.

जयसिघांनीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची पाच पथके काम करत होती. त्यातील तीन पथके गुजरातमध्ये तर दोन महाराष्ट्रात शोध घेत होते. तो तंत्रज्ञानाचा वापर करून आपली ओळख लपवून राहत होता. गोपनीय सूत्रांच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या माहितीनुसार तो गुजरातमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. तसेच तो शिर्डीतून गुजरातच्या बरदोली येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी गुजरातमध्ये सापळा रचून रविवारी (ता. १९) रात्री भरुच-बडोदामार्गे गोध्राला जाताना जयसिघांनीला बेड्या ठोकल्या. त्याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर आणि एका नातेवाईकालाही अटक करण्यात आली आहे. जयसिंघानीकडे विविध कंपन्यांचे डिव्हाइसेस आणि इंटरनेट वापरण्यासाठी असणारी विविध यंत्रणाही जप्त करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानीला पुढील तपासासाठी मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

१५ गुन्ह्यांची नोंद
अनिल जयसिंघानिविरोधात आतापर्यंत १५ गुन्हे नोंद आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तो फरार होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तो इंटरनेटचा शिताफीने वापर करून अनेकांच्या संपर्कात राहत होता.

यापूर्वी दोनदा अटक
जयसिंघानीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन उपायुक्त अमर जाधव यांनी २००४ मध्ये अटक केली होती. पुढे जाधव यांनीच २००९ मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागात उपायुक्त असताना त्याला अटक केली. त्यावेळी जयसिंघानीने जाधव यांच्यावर आरोप केले. या प्रकरणी तत्कालीन अतिरिक्त पोलिस आयुक्त के. एम. प्रसन्ना यांनी रितसर चौकशी केली. या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नव्हते.