विक्रमगडमध्ये अवकाळीचा पुन्हा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये अवकाळीचा पुन्हा फटका
विक्रमगडमध्ये अवकाळीचा पुन्हा फटका

विक्रमगडमध्ये अवकाळीचा पुन्हा फटका

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २१ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात मंगळवारी (ता. २१) पहाटे पाच वाजल्यापासून बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील काही भागात अर्धा तास मुसळधार पाऊस बरसला; तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. यामुळे सर्वसामान्य शेतकरी, बागायतदार, वीटभट्टी व्यावसायिक यांच्यात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागील आठवड्यात काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला होता. आंबा, त्याचप्रमाणे इतर रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी असतानाच मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा विक्रमगड शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली.